दिव्यांगाचा ५ टक्के निधी अखर्चित ठेऊ नये

180

🔸तालुक्यातील ग्रामपंचायत यांना प्रहार सेवक विनोद उमरे आव्हान 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.23 फेब्रुवारी) :- चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी तत्काळ दिव्यांग ५%निधि वितरित करा अन्यथा गाठ प्रहार सेवक यांच्याशी आहे असा खणखणीत इशारा विनोद उमरे यांनी चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत यांना दिली.चिमूर तालुक्यातील काही ग्रामपंचायत हे दिव्यांनाचा ५%निधि अखर्चित ठेवतात.

तरी चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत यांना आव्हान करतो की दिव्यांग निधी त्वरित वितरित करण्यात यावे. जर चिमूर तालुक्यातील काही ग्रामपंचायत जर अपंग निधि जर वितरित करत नसेल आपल्या परिसरातील प्रहार सेवक यांना तत्काळ कळवा ग्रामपंचायत सचिव यांना प्रहार टाईल ने त्यांना समजावून दिव्यांग निधी वितरित करण्यात लाऊ असा उमरे यांनी सांगितले.