माकोना येथे घराला लागली आग

🔸आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.18 ऑक्टोबर) :- पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या माकोना या गावात आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास अचानक घरात आग लागल्याने गावात खडबळ उडाली . अखेर ही आग लागली च कशी यावर अनेक चर्चा सुरू आहे तर काहींच्या मते देव घरात पूजा अर्चना केली असता दिव्याची वात उंदराने नेली असावी त्यामुळे घरात आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शिवाय ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी कसरत करून आगीवर नियंत्रण मिळवले परंतु या आगीमध्ये मेश्राम यांचे अधिक नुकसान झाले असून संबधित विभाग मान. तहसीलदार साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पंचनामा करावा व पीडित कुटुंबीयांला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.