प्रा. आ. केंद्र शेगाव बू. च्या नवीन इमारतीचे आ. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.8 मार्च) :-  स्थानिक शेगाव बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र याची नवीन वास्तू नवीन इमारत गेल्या अनेक वर्षापासून तयार होऊन धूळ खात होती परंतु याचा शुभारंभ करण्याकरिता अजून पर्यंत देखील शुभारंभ मिळत नव्हता परंतु अखेर जनतेच्या सेवेकरीता जनतेच्या आरोग्याचा विषय लक्षात घेता या इमारतीचे उद्घाटन तात्काळ करण्यात यावे व जनसेविकरीता याचा लाभ व्हावा याकरिता गावातील अनेक पुढारी तसेच नागरिकांनी अनेक आंदोलन देखील केले होते.

परंतु आज येथील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते आज मोठ्या थाटामाटाने या इमारतीचे वास्तूचे उद्घाटन झाली असून याचा लाभ तात्काळ येथील तसेच गाव खेड्यातील अनेक नागरिकांना याचा लाभ होईल यासोबत रुग्णवाहिका याचीसुद्धा लोकार्पण करण्यात आले. याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार असून याचा लाभ अनेक नागरिकांनी घ्यावा असे प्रतिपादन माननीय श्रीमती आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे तसेच जनसेवा हीच ईश्वर सेवा तसेच माझ्या भागातील कोणताही गोरगरीब नागरिक महिला विद्यार्थी वृद्ध हा वीणा उपचाराणे दगावणार नाही तसेच येथील नागरिकांना वेळोवेळी औषधोपचार सदैव मिळेल याकरिता मी सदैव तत्पर असेल असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. 

       तीन कोटी तीस लाख रुपयांच्या वास्तूचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री सिद्धार्थ पाटील सरपंच ग्रामपंचायत शेगाव बु. उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री राजेंद्र चिकटे माजी सभापती कृ. ऊ. बा. स. वरोरा . डॉ. अशोक कवटे जिल्हा आरोग्य अधिकारी. डॉ. प्रतीक बोरकर तालुका अधिकारी ,श्री गजानन मुंडकर गटविकास अधिकारी वरोरा. आदी मान्यवर उपस्थित होते. याच सोबत व्यासपीठावर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद गंपावार , डॉ. प्रमोद बोंदगुलवार , विजय आत्राम , यशवंत लोडे , चंदु जयस्वाल , योगेश खामनकर, साधनाताई मानकर उपसरपंच इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

      शेगाव बु.येथे आरोग्य केंद्र सुरू झाले व येथे लवकरच शवविच्छेदन केंद्राची सुद्धा मागणी करून व ती तात्काळाने पूर्ण करेल आज या इमारतीचे उद्घाटन म्हणजेच परिसरातील तसेच स्थानिक गोरगरीब नागरिकांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण आज पासून सर्व जनतेला याचा लाभ होत असून सर्व जनता सुदृढ राहील असे मत त्यांनी आज आपल्या भाषणातून व्यक्त करून नागरिकांचे मन जिंकले.