सांगा सरकार,दरमहा मिळणाऱ्या अत्यल्प पैशात आम्ही जगायचे कसे

🔸प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

🔹अपंग विधवा निराधारांना तोकडे अनुदान येऊ नये 

✒️ चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.7 फेब्रुवारी) :- अपंग विधवा निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते .हे अनुदान अत्यंत कमी आहे . महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी.अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.महागाई वाढत असल्याने अनुदान तचपुंजे ठरत आहे.

महागाईच्या काळात त्यांना मिळणारे अनुदान अल्प असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.दैनंनिक गरजेच्या वसतूंचे दर मोठ्या वाढले आहे.त्यामुळे अपंग विधवा निराधारांचे तोकड्या अनुदानात भागवणार कसे ,असा प्रश्न आहे.यासाठी शासनाने यांची दखल घ्यावी अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.