चंद्रपूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा चंद्रपूर येथे संपन्न Chandrapur District Selection Chess Tournament concluded at Chandrapur

▫️खेळ,शिक्षण व आरोग्य यांचे संतुलन असणे अत्यंत गरजेचे- मा.श्री. हिराजी कन्नाके, चंद्रपूर(It is very important to have a balance between sports, education and health – Mr. Hiraji Kannake, Chandrapur)

चंद्रपूर(दि.24 जुलै) :-क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूर जिल्हा अंडर 7 व 19 निवड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 23 जुलै 2023 ला कुणबी समाज सभागृह चंद्रपूर येथे घेण्यात आली. स्पर्धेत 39 स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

      ही स्पर्धा निवड स्पर्धा होती. अंडर 7 खेळाडू मधून 2 मुले व 2 मुली स्पर्धकाची तर अंडर 19 मधून मुले 4 व मुली4 असे राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली. 

अंडर 7 मुली मधे रावी यादव प्रथम , इरा वैद्य द्वितीय तर मुला मधे कनिष्क इंदुरकर 

 प्रथम क्रमांक , पार्थ नारनवरे द्वितीय , अंडर 19 मुली मधे प्रथम परिनिता अर्डे तर द्वितीय इशिका जारोंडे, तृतीय इशिका सहारे, चतुर्थ श्वेता अगळे यांनी पटकाविले. मुला मधे निहान पोहाणे प्रथम, हर्षित कष्टी द्वितीय , हेरंब निर्वाण तृतीय, सार्थ भुजाडे चतुर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम व द्वितीय विजेत्यांना राज्य बुद्धिबळ स्पर्धा फी करीता प्रत्येकी हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तसेच तृतीय व चतुर्थ विजेत्यांना मेडल प्रदान करण्यात आले. त्याच बरोबर बेस्ट अंडर 7,9,11,13,15,17 यांना सुध्दा मेडल देण्यात आले.

 कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर व कुमार कनकम सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. कार्यक्रमाला आयोजित करण्यास नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .),यांनी अथकपणे प्रयत्न केले.स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष मा.आश्विन मुसळे सर, डॉ.सप्निल टेंभे,डॉ. बोबडे, सर्व उपस्थित पालक, कोच, या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.