दारू दुकानाविरोधात महिलांचा प . स. वर मोर्चा           

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

वरोरा (दि.7 फेब्रुवारी) :- तालुक्यातील नागरी ग्रामपंचायत च्या वादग्रस्त ग्रामसभा विरोधात नागरी गावातील महिलानी पंचायत समिती वरोरा येथे मोर्चा घेऊन धडकल्या . सविस्तर असे की नागरी ग्रामपचायतीतर्फे नवीन देशी दारू दुकान सुरू करण्याचा ठराव ग्रामसभा घेऊन मंजूर करण्यात आला,ही ग्रामसभा बेकायेशीररित्या घेण्यात आली आहे असे निवेदन दुसऱ्याच दिवशी बी. डी. ओ.वरोरा आणि सी. ई. ओ. चंद्रपूर यांना डॉ.मनोज तेलंग यांनी दिले.

दोन दिवसांनी नागरी गावातील महिला पुरुष पंचायत समितीवर मोर्चा घेऊन धडकले.त्यावेळी चौकशी करून योग्य कारवाई करतो असे आश्वासन देण्यात आले. ११जाने.ला विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली आणि बायान नोंदवले.परंतु महिना लोटला तरी चौकशी चे पुढे काय झाले?याचे कोणी उत्तर देत नव्हते म्हणून सोमवारी पुन्हा नागरी वासी पंचायत समितीवर आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मोर्चा चे रूपाने धडकले.

    २९डीसे. ला नागरी येथे जी ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभा मध्ये ३विषय १५मिनिटात घेऊन ग्रामसभा गुंडाळल्या चा आरोप करत दारू सारख्या संवेदनशील विषय करिता विशेष आणि महिला ग्रामसभा घेणे अनिवार्य असून सुद्धा ती घेण्यात आली नाही . पंधरा मिनिटात ३विषयावर चर्चा आणि ठराव पास झाले २४०उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत हे कसे शक्य आहे? सरपंच उपस्थित नसले तर उपसरपंच हे ग्रामसभा अध्यक्ष होऊ शकतात मात्र ते दोधेही उपस्थित असताना दिलीप टिपले यांना ग्रामसभा अध्यक्ष कसे केले? हे दिलीप टिपले कोण? आजवर ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करण्यात आल्याचा इतिहास असताना ह्या ग्रामसभेला कोरम पूर्ण झाला उपस्थितांना पैसे देऊन आणल्या गेल्याचे पुरावे बी.डी. ओ.समोर सादर करण्यात आले.

त्यामुळे ही ग्रामसभा बेकायदेशररित्या घेन्यात आल्याने ती ग्रामसभा रद्द करण्यात यावी आणि पूनच्य दारू दुकानाला नाहरकत देण्या बाबत फक्त हा एकच विषय घेऊन महिलांच्या आणि पंचायत समिती स्तराहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखी खाली गरज पडल्यास मतदान घेऊन बहुमताने हा संवेदनशील विषय मार्गी लावावा .अशी मागणी यावेळी खंड विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना निवेदाद्वारे करण्यात आली.यावेळी शिष्टमंळात रोहिणी देवतळे ,डॉ.मनोज तेलंग ,चंद्र शेखर नौकरकर,डॉ.भगवान गायकवाड,बाबा भगडे,जयश्री वाघमारे,डिंपल शेख,गंगा वातमोडे ,सुनील घोलार ,योगराज झाडे, शारदा निकुरे यांचा समावेश होता 

     ग्रामसभा झाली त्याबाबत चौकशी समिती नेमून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे.वरिष्ठांचे आदेश आल्या नंतर योग्य ती कारवाही केली जाईल अशी प्रतिक्रया संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडसेलवर यांनी दिली आहे.