गावखेड्यात स्वच्छ भारत मिशन अभियानाचा उडाला बोजवारा चिमूर पंचायत समितीचा ढिसाळ कारभार…विनोद उमरे यांचा आरोप

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.11 मार्च) :- संत गाडगेबाबा यांनी देशवासीयांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला.त्यातून सरकारकडून स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते त्यासाठी शासनाकडून भरपूर निधी दिला जातो. परंतु चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात या अभियानाचा वट्याबोळ झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप प्रहारसेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केला आहे.

गाव खेड्यात घाणीचे साम्राज्य पसरल्याऱ्या दुर्गंधीमुळे गाव खेड्यामध्ये साथीच्या रोगाचा फहिलाव होण्याची भीती पसरली आहे. काही गावात नाल्या असून कचऱ्याने भरलेले आहेत. त्या साप नसल्याने रस्त्यावर पाणी वाहत असून रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.तर अनेक गावात सार्वजनिक शौचालय नाही कचराकुंड्या नसल्याने कचऱ्याचे ढीग रस्त्यावर जमा झाल्याचे दिसून येत आहे.

त्याचेच कारण पंचायत समिती कर्मचारी ग्रामसेवक यांची उदासीता दिसून मुख्यालय न राहणे महिन्यातून एकदाच गाव खेड्यात जाणे तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय करता १२हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु बहुतांश लाभार्थ्यांना स्वच्छ भारत योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोपही प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केला आहे.

गाव खेड्यात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.गुड मॉर्निंग पथक केवळ कागदपत्री दिसत आहे. चिमूर पंचायत समितीच्या ढीसाळ कारभारामुळे तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.