घोडपेठ क्षेत्रातील महिला व युवा यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेश

🔸शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

🔹पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने महिलांनी घेतला पक्ष प्रवेश

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.2 फेब्रुवारी) :- तालुक्यातील जिल्हा परीषद क्षेत्रातील घोडपेठ, चालबर्डी, कचराळा, चपराळा, गुंजाळा, घोट निंबाळा, गोरजा, मोहबाळा, कवठी, तिरवंजा, सायवान येथील असंख्य महिला, युवा व पुरूषांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे तथा तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात 01 फेब्रुवारीला पक्षप्रवेश घेतला.

 शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख नेते आमदार भास्करजी जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे तसेच तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांचे मार्गदर्शन व पुढाकाराने तसेच पदाधिकारी प्रमोद येसेकर, सुनिल चौधरी, सचिन फटाले यांच्या नेतृत्वात तथा महिला पदाधिकारी जनाबाई गाणफाडे, सुमित्राबाई सुर, विमल फटाले यांच्या नेतृत्वात जिल्हा परीषद क्षेत्रातील घोडपेठ, चालबर्डी, कचराळा, चपराळा, गुंजाळा, घोट निंबाळा, गोरजा, मोहबाळा, कवठी, तिरवंजा, सायवान येथील असंख्य महिला, युवा तसेच पुरूषांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश केला. 

            शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती झाल्यापासुन शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. ज्येष्ठ व युवा शिवसैनिकांना सोबत घेवून व कोणताही भेद न ठेवता पक्षावर निष्ठा असलेल्या सर्वांना सामावून घेवून त्यांचे कार्य करीत असल्याने सर्वांना पक्षात कार्य करण्याची संधी मिळत आहे.

त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन असंख्य शिवसैनिक पक्षात पक्षप्रवेश घेतांना दिसत आहे. हिन्दुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकृत केलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भूमिकेतून रविंद्र शिंदे या परिसरात शिवसेनेचे कार्य करीत आहे. पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे जनतेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढत आहे. 

         त्याच अनुषंगाने 01 फेब्रुवारी रोज गुरुवारला रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे तसेच तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या मार्गदर्शन तसेच पुढाकाराने घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्र येथील पदाधिकारी प्रमोद येसेकर, सुनिल चौधरी, सचिन फटाले यांच्या नेतृत्वात पुरुष व युवा मध्ये डॉ. खंगार, संदीप सुर.

धनराज गणफाडे, भाऊराव वनकर, संजय चौधरी, गौरव पाटील, विलास मिलमिले, गुणवंत खेडेकर, आशिष मिश्रा, अविनाश भगत, गणेश घोरपडे, सुधिर राऊत तसेच महिला पदाधिकारी जनाबाई गाणफाडे, सुमित्राबाई सुर, विमल फटाले यांच्या नेतृत्वात कविता राऊत, अरुणा वर्मा, अर्चना साव, सोनाबाई तांदुळकर, रेशमा विधाते, सुनिता येसेकर, शिला चौधरी या महिला युवा व पुरूषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती तालुका कार्यालय “शिवनेरी” येथे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.

             याप्रसंगी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या सोबत विधानसभा महिला आघाडी, युवा-युवतीसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

 जिल्हा परीषद क्षेत्रातील घोडपेठ, चालबर्डी, कचराळा, चपराळा, गुंजाळा, घोट निंबाळा, गोरजा, मोहबाळा, कवठी, तिरवंजा, सायवान येथील प्रवेश घेतलेल्या महिला, युवा व पुरुषांना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल, महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, भद्रावती प.स. सदस्या अर्चना ताजणे, माजी नगर सेविका सुषमाताई शिंदे, भद्रावती कृउबास उपसभापती अश्लेषा जिवतोडे-भोयर तसेच उपस्थिती पदाधिकारी व शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.