नागरी येथे पुरूषांचे व महीलांचे कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.29 जानेवारी) :- ह्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रघुवीरभैय्या हंसराजजी अहीर भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उद्घाटक श्री. करण संजयजी देवतळे प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा प्रमुख अतिथि श्री रमेशजी राजूरकर सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रकाशराव बावणे सरपंच ग्रामपंचायत नागरी विकासराव डांगरे माजी पंचायत समिती सदस्य मंगेशराव भलमे ग्रामपंचायत सदस्य नागरी प्रमोदराव धात्रक संचालक बाजार समिती वरोरा विठ्ठलराव वरभे सर विजयजी मोकाशी राहुल सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते जी बोंबले सर उपस्थित होते.

ह्या प्रसंगी सूरज धात्रक तालुका महामंत्री भाजपा युवा मोर्चा यांनी संबोधित करताना असे म्हटले की आधुनिक काळात वाटचाल करताना मातीशी जोडलेले खेड हरवत चालले आहे हे खेळ टिकवायचे असेल व निरोगी राहण्यासाठी अश्या प्रकारचे स्पर्धेचे आयोजन होणे ही काळाची गरज आहे ह्या प्रसंगी गावातील शेकडो नागरिक युवक युवती उपस्थित होते ह्या प्रसंगी माजी कबड्डी पटू श्री विठ्ठलराव वरभे सर व जय हिंद क्रिडा मंडळाची नॅशनल महिला खेळाडू कु. वैष्णवी ह्यांचा मान्यवरांच्या हसते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला