विहारित उडी घेत युवकानी संपवली जीवनयात्रा The young man ended his journey by taking a leisurely jump

🔸२५ वर्षीय गरीब युवकाणे उचलले टोकाचे पाऊल(A 25-year-old poor youth took an extreme step)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.5 जुलै) :- मधील दुर्गेश बंडू बावणे वय २५ वर्षे या युवकाणे काल रात्री विहारित उडी घेत आपली जिवन यात्रा संपवली आहे.

 कुटुबीयांनी दिलेल्या माहिती नुसार दुर्गेश हा मजुरी करुन आपल्या उदरनिर्वाह करीत असत सदर युवक हा अविवाहित असून त्याला पोटाचा त्रास होता. काल दि. ४ जुलै ला रात्री अचानक तो घरून निघून गेल्याने घरच्यांनी त्याचा सगडीकडे शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्या मुळे घरचे निराश होऊन घरी परतले व आज सकाळी परत शोध घेण्याला सुरुवात केली असता घरा पासून काही अंतरावर असलेल्या राम मंदिर परिसरातील विहरिमध्ये तो मृत अवस्थेत आढळून आल्याने घरच्यावर दुखाचा डोंगरच कोसळला.

घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन ला मिळताच घटनास्थळ गाठून बॉडी ला विहारिबाहेर काडून पंचनामा करुन पोस्टमॉटम करण्यासाठी उपाजिल्हा रुग्णालय वारोरा येथे पाठवण्यात आले.

घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस शिपाही मदन येरमे, अतुल कनवटे हे करीत आहे.