घरफोडून अज्ञात चोरट्याने १० ग्राम सोने व ८० हजार रुपये लंपास केले An unknown thief looted 10 grams of gold and 80 thousand rupees after breaking into the house

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी) 

भद्रावती (दि.24 जून) :- शहरातील भोजवार्ड येथे राहणाऱ्या सुधाकर कवासे यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील दहा तोळे सोने व ८० हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर कवासे व त्यांचे कुटुंब काही कामानिमित्त पुणे येथे गेले होते.

अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून खिडकीद्वारे घरात प्रवेश करून आतील दरवाजा फोडला व घरातील कपाट फोडून कपाटात असलेले दहा तोळे सोने व 80 हजार रुपये लंपास केले..

कवासे कुटुंब पुण्यावरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला.

पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रोला पाऊस आला असल्याने श्वानपथकाला या अज्ञात चोरट्यांचा माग काढता आला नाही.

या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून भद्रावती पोलीस या अज्ञात चोरट्यांच्या शोधात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.