चंद्रपूर जिल्ह्यातील मिंडाळा जंगलात दोन वाघाचा मुक्त संचार 

🔹अनेक पर्यटकाला वाघाचे दर्शन

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.30 जानेवारी) :- नागभीड मिंडाळा वनपरिक्षेञात येत असलेल्या कोदेपार जंगलात सोमवारला सकाळी दोन वाघ ठाण मांडुन मिंडाळा-कोदेपार रस्त्याच्या कडेला बसुन असल्याने त्या रस्त्यावरून जाणाऱ्या -येणार्या अनेक लोकांनी दर्शन घेतले. याची माहीती परीसरातीत होतांच वाघ पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.

बघता-बघता शेकडो लोक त्या ठिकाणी जमा झाले.तो पर्यत ते दोन वाघ जंगलात निघुन गेली होती. मिंडाळा-कोदेपार हा रस्ता ओलंड्याचा त्यांचा मार्ग असल्याने कधी तरी रस्ता ते वाघ ओलांडतील व पुन्हा वाघाचे दर्शन होतील या आशेने येथिल लोक प्रतिक्षा करीत थांबले होते. वृत्त लिहे पर्यत या दोन वाघांनी रस्ता ओलंडला नाही.

या परीसरात मिंडाळा,कोदेपार,तुकुम,तिव्हाला ही गावे आहेत. या गावातील शेत्या अगदी या वनाला लागुन आहेत.त्याच बरोबर घोडाझरी अभ्यारण्य लागुनच आहे.अनेक वेळा लोकांच्या शेतात शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झालेआहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.मौशी परीसरात वाघाने तिन महीण्यात पाँच बळी घेतले आहे.

आता आपला मोर्चा वाघाने कोदेपार च्या वनात वळविला आहे.लोकांच्या शेतात लाखा लाखोळी,चना,गहु असे रब्बी पिके आहेत. त्यासाठी दररोज शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागत आहे.त्यासाठी वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.