✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)
वाघेडा (दि.18 जानेवारी) :- बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन गावातील शिवसैनिक यापुढे गावातील समस्येचे निराकरण करतील व गावाच्या विकासात हातभार लावेल असे मत पारडी येथील सत्कार समारंभ कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्र विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर गावातील प्रथम नागरिक सरपंच वंदना जूनघरे, उपसरपंच जयंत राऊत, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, खांबाळा आबा मक्ता, जि.प. सावलीचे उप तालुका प्रमुख सुधाकर बुर्हाण ,टेमुर्डा चिकणी सर्कलचे उपतालुकाप्रमुख गजानन गोवारदिपे, आबा मक्ता पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख देवेंद्र बोधाने, डॉ. नरेंद्र दाते उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले ,गावातील कोणती समस्या असली तर सर्वप्रथम गावकर्यांनी सेनेच्या शिवसैनिकाला ती सांगावी व त्याला योग्य ते न्याय मिळवून देण्याची हमी रवींद्र शिंदे यांनी शिवसैनिकाच्या खांद्यावर दिली.
वरोरा शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर गावकर्यांना संबोधित करताना म्हणाले की, यापुढे वरोरा तालुक्यात प्रत्येक गावातील शिवसैनिकांनी जी मोठी फळी उभारलेली आहे, त्या सर्व शिवसैनिकांनी आपापल्या गावातील समस्येचे निराकरण करून घ्यावे तसेच श्री.स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल, रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सर्व योजनांची माहिती देऊन त्या समस्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गावकर् यांना केले. पारडी गावचे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे महत्त्व सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
