थोराना येथे सतगुरु जगन्नाथ बाबा यांचा  वार्षिक काला महोत्सव

🔹सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे  यांची उपस्थिती

✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.18 जानेवारी ) भद्रावती तालुक्यातील थोराना येथे दि. १६ जानेवारी रोज सोमवारला थोराना येथे सतगुरु जगन्नाथ बाबा यांचा  वार्षिक काला उत्सव आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष व  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी व्यासपिठावर माजी जि.प. सदस्य प्रविण सूर, विनोद मालू, मारोती तावडे, संदिप इंगोले, शेषराव झट्टे, मनोहर झट्टे, दत्तुजी भट, आण्याजी भोयर,  शैलेश झट्टे, दादाजी इंगोले, व शंकर बोदाडकर उपस्थित होते.

याप्रसंगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रबोधनात्मक मार्गदर्शन, पालखी काढण्यात आली. भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय किर्तनकार रवीभाऊ इंगोले यांनी किर्तन सादर केले. दहीहांडी फोडण्यात आली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमामुळे गावात नवचैतन्य पसरले.