महिला -भगिनी  व सर्वसामान्य जननतेच्या रक्षणासाठी शिवसैनिक सदैव तत्पर : रविंद्र शिंदे 

295

🔹घोडपेठ येथील  हळदीकुंकू व स्नेहमिलन सोहळ्याला उदंड प्रतिसाद 

✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.19 जानेवारी) :- भारतीय संस्कृतीत महिला -भगिनींना देवदेवीतांची उपमा दिलेली आहे. संत व थोर विचारवंतांच्या मते ज्या परिवारात आणि  ज्या समाजात माता, महिला व भगिनींचा नेहमी मानसन्मान होतो. त्या ठिकाणी ईश्वरी शक्ती नांदत असते. त्या परिवाराची व समाजाची सर्वच दृष्टीने भरभराट व प्रगती होते. त्यामुळे महिला -भगिनी  व सर्वसामान्य जननतेला योग्य न्याय मिळाला पाहीजे. त्यांची सर्वांगीण  प्रगती झाली पाहीजे .यासाठी महिला -भगिनी  व सर्वसामान्य जननतेच्या रक्षणासाठी शिवसैनिक सदैव तत्पर राहील. असे प्रतिपादन शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी केले.

       आज दि. १९ जानेवारी रोजी घोडपेठ येथील किसान भवन  येथे आयोजित केलेल्या  हळदीकुंकू व स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या सोहळ्याला परीसरातील महिला भनिनिंचा उदंड प्रतिसाद लाभला. 

          हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व मकरसंक्रांतीच्या शुभ पर्वावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी चंद्रपूर यांचा विद्यमाने वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात दोन्ही  तालुक्यात हळदी कुंकू तसेच स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आजचा सोहळा आयोजित करण्यात आला.

         याप्रसंगी व्यासपिठावर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर , उदघाटिका पूर्व विदर्भ महिला संघटिका व प्रवक्त्या  शिल्पा बोडखे  ,प्रमुख मार्गदर्शन वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे , उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर डूकरे, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर,  शहर प्रमुख घनश्याम आस्वले, घोडपेठचे उपसरपंच प्रदिप देवगडे, महिला उपजिल्हाप्रमुख माया नारळे, माजी नगरसेविका सुषमा शिंदे, माजी पं.स. सदस्या आश्विनी ताजने व माहिला तालुका संघटिका  लता खरवडे उपस्थित होत्या.

      या प्रसंगी  सोहळ्याच्या उदघाटिका पूर्व विदर्भ महिला संघटिका व प्रवक्त्या  शिल्पा बोडखे म्हणाल्या की ,महिलांनी स्वतः मधील कुवत ओळखून सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे,  शिवसेनेला  रविंद्र शिंदे यांच्या रूपाने  समाजकारण व राजकारणाची कास धरून विकासाची तळमळ असलेला  चेहरा  या क्षेत्राला लाभलेला आहे . यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पक्ष अधिक जोमाने  मजबूतीकडे  वाटचाल करीत आहे. याप्रसंगी व्यासपिठावरील सर्वच अतिथींनी समयोचित मार्गदर्शन केले. महिलांनी हळदीकुंकू कार्यकमात वाण वाटप करून सर्वांना तीळगुड दिला.कार्यक्रमाचे संचालन महाडोळीच्या सरपंच प्रतिभा मांडवकर, प्रास्ताविक भास्कर ताजने व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर डुकरे यांनी केले.

     सोहळा आयोजनासाठी कांता बोबडे, सरोज रामटेके, सचिन फटाले, अमोल कारेकर , धनराज गनफडे, संदिप सूर, अमित निमकर,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या सोहळ्यात घोडपेठ व तिरवंजा ( मो. ) परीसरातील महिला भागिनी फार मोठया संख्येत सहभागी झाल्या होत्या.

https://smitdigitalmedia.com/