बापरे. माजरी वणी शेत शिवारात आढळला वाघिणीचा मृतदेह

✒️वरोरा( विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.15 जानेवारी) :- चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी-भद्रावती मार्गाच्या कडेला मृतावस्थेत आढळली वाघिणी, माजरी वणी रेल्वेमार्गाच्या 50 मिटरवर आढळली वाघीण, देवराव पाटेकर यांच्या शेतात मृत वाघीण आढळल्यावर वनविभागाला देण्यात आली माहिती, वनपथकाने घटनास्थळी पोचून सुरू केली पंचनामा कारवाई, या वाघिणीचे काही बछडे आहेत का? याविषयी घेतली जात आहे माहिती, हा अपघात की घातपात यादृष्टीने देखील केला जात आहे .

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी-भद्रावती मार्गाच्या कडेला वाघीण मृतावस्थेत आढळली आहे. माजरी- वणी रेल्वेमार्गाच्या 50 मिटर अंतरावर वाघीणीचा मृतदेह आढळला आहे. स्थानिक शेतकरी देवराव पाटेकर यांच्या शेतात मृत वाघीण आढळल्यावर वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनपथकाने घटनास्थळी पोचून पंचनामा कारवाई सुरू केली आहे या वाघिणीचे काही बछडे आहेत का? याविषयी माहीती घेतली जात आहे. हा अपघात की घातपात यादृष्टीने देखील तपास केला जात आहे.