बेघर वासियांचे पुनर्वसन करा .भा. यु.मो. सुरज धत्राक यांची मागणी Rehabilitate the homeless.B. U. Mo. Suraj Dhatrak’s demand

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23 जुलै) :- मागील 65 वर्षापासून नागरी येथिल प्रभाग क्रा 3 मध्ये नाल्या लगत बेघर कॉलनी आहे अगोदर नाला रुंद आणि साफ असल्याने काही वर्ष नागरिकांना पुराचा तितका फटका बसत नव्हता परुंत गेल्या 20 ते 25 वर्षांपासून नाल्या ची अवस्था खराब झाल्याने पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जायला सुरुवात झाली.

 प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली की येथिल रहिवाश्यांनच्या जीवन शैली वर फरक पडतो घरातील अन्य धान्य खराब होत असते साप विंचू यांची भीती लागलेली असते अनेक घरांच्या भीती कमजोर झाल्या असून ग्रामपंचायत ने ठराव मंजूर करून प्रशासनाला बेघर वसियांची पूनरवसन करण्याची मागणी केली आहे ..