16 जानेवारी आजचा दिनविशेष

✒️ शेगाव बू. (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.16 जानेवारी)

2008 :- टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.

1998:- उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

1996 :- पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव धोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.

1995 :- आय एन एस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.

1979 :- शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजीप्त मध्ये पलायन केले.

1978 :- रू.1000 अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द .

1955 :- पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी च्या इमारतीचे तात्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.

1941 :- नेताजी सुभाष चंद्र बोस देशाबाहेर प्रयाण.

1920 :- अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या 14 कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची(league of Nations) पहिली बैठक झाली.

1681 :- छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.

1666 :- नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पल्हाड गड जिंकण्याचा शिवाजी राजांचा डाव फसला.

1660 :- रुस्तम इमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालून आले आणि पराभूत होऊन परत गेले.