स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, द्वारा रुग्णाला आर्थिक मदत self Financial assistance to the patient by Srinivas Shinde Memorial Ravindra Shinde Charitable Trust

137

🔸ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा : रविंद्र शिंदे(Take advantage of the various social activities run by the trust: Ravindra Shinde)

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती(दि.5 जुलै) :- स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत तालुक्यातील कान्सा शिरपूर येथील एका रुग्णाला आर्थिक सहकार्य करण्यात आले.

              भद्रावती तालुक्यातील कान्सा शिरपूर येथील गजानन यशवंत कुंभारे हा नागरीक अनेक महिन्यांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. जेमतेम परिस्थिती असल्याने त्याला पुढील आजाराकरीता आर्थिक सहकार्य हवे आहे. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याबाबत गजाननला माहित झाले. त्याने ट्रस्ट कडे मदतीची मागणी केली व ट्रस्टने कसलाही विलंब न लावता त्याला आर्थिक सहकार्य केले. 

                यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, व सदस्या सुषमाताई शिंदे उपस्थित होते.

               श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत यापूर्वी विविध गंभीर आजारांच्या अनेक रुग्णांना आर्थिक सहकार्य करण्यात आले. सोबतच निःशुल्क आरोग्य शिबिर घेवून रुग्णांची तपासणी व आजारांवरील उपचाराकरिता आर्थिक सहाय्य करण्यात आले.

            ट्रस्ट तर्फे विविध समाज उपयोगी अभियान राबविल्या जात असून गरजूंनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे म्हणाले.