✒️ शेगाव (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.3 जानेवारी):- शेगांव बू येथील सूपरिचित असलेले नाभिक समाज कार्यकर्ते व तसेच शिवसेना विभाग प्रमुख श्री.होमराज घुमे यांच्या हेअर स्टाईल दुकानामध्ये भारतातील पहिली स्त्री शिक्षिका.भारतीय समाजसुधारक. शिक्षणतज्ज्ञ तसेच कवयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले मानली जाते.पति ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
जाती आणि लिंगांवर आधारित लोंकावरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली महिलांसाठी शिक्षणाचे व्दार उघडणारऱ्या अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणा़यात आली.
यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तालुका अध्यक्ष आदरणीय श्री.त्रिशूलभाऊ बोंन्दगुलवार तसेच शेंगाव पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे अध्यक्ष असलेले आदरणीय श्री.उमेशभाऊ माकोडे नाभिक समाजाचे कार्यकर्ते श्री.धनराज भाऊ घुमे माळी समाजाचे नेतृत्व करणारे आणि अध्यक्ष असलेले श्री.सचिनभाऊ फुलकर,कडवंट शिवसैनिक श्री नानाभाऊ जगताप तसेच वरोरा तालुका संघटक श्री.सचिनभाऊ रासेकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.कवडूजी तुळसकर श्री.संजुभाऊ घोडमारे किसनजी पाडेवार प्रकाश भाऊ खांदारे,प्रकाशभाऊ सोनार्थी,अनिकेत आंबुलकर व राजूभाऊ बोकडे इत्यादि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
