चंदनखेडा येथे पार पडली भव्य १६०० मिटर मॅराथॉन स्पर्धा

🔹नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार व शौर्य क्रिडा मंडळ,उत्फुर्ष क्रिडा मंडळ, नेहरू विद्यालय, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांचा संयुक्त विद्यमाने उपक्रम

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा सप्ताह चे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम विविध स्पर्धा घेण्यात येत आहे तरी या निमित्ताने आज दिनांक .२० जानेवारी शनिवार ला चंदनखेडा.येथे नेहरु युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष हनवते. यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनखेडा येथे भव्य १६०० मिटर मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी मॅराथॉन स्पर्धेचे उद्धाटन महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, गावचे सरपंच नयनराव जांभुळे, पोलिस पाटील समिरखान पठाण, नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत पुनवट सर ,संजय ब्राह्मणकर, नंदकिशोर जांभुळे, मोहित शेंन्डे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी परिसरातील भरपुर युवा, तरुण वर्गानी , नेहरू विद्यालयाच्या शाळकरी विद्यार्थीनी सुद्धा या मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धेचा आस्वाद घेतला.या स्पर्धेत वरोरा तालुक्यातील भिवकुंड येथील गोपाल गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला,तर वरोरा तालुक्यातीलच सातारा येथील इंद्रजित भरडे याने दुत्तिय क्रमांक पटकावला,तर भद्रावती तालुक्यातील चरूर (धारापुरे) येथील अमर विनायक श्रिरामे याने तृतीय क्रमांक पटकावला यांना लगेचच बसस्थानक परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य शौर्य क्रिडा मंडळाचे शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, कुणाल ढोक, विजय खडसंग,भुपेश निमजे,प्रविण भरडे, मंगेश झिंगरे,दिलिप ठावरी, शंकर दडमल, प्रज्वल बोढे,विवेक डुकसे,अनिकेत डुकसे,सुरज भोयर, आशिष बारतीने, गोलु गुरुनुले,वैभव भरडे यांनी यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.