चंदनखेडा येथे घोडा महोत्सव उत्साहात साजरा आमदार प्रतिभाताई यांच्या हस्ते विविध शिबिराचे उद्घाटन

✒️ चंदनखेडा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंदनखेडा (दि.१४ डिसेंबर) :-भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहन कालीन सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे पुरातन कालीन माधवराव महाराज देवस्थान चंदनखेडा येथे मार्गाशीष महिन्याच्या तिसऱ्या शनिवार पासून ते सोमवार पर्यंत घोडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले

या घोडा उत्सवात आजूबाजू च्या गावातील जवळपास 25 हजार नागरिक सहभागी होतात त्या निमित्याने ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विध्यमाणे आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उत्सवात येणारे अनेक भाविक भक्तांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबाचे उदघाटन गावचे उपसरपंच सौ. भारती ताई उरकांडे यांच्या हस्ते करण्यात आले तर उडघटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे होते

. या आरोग्य तपासनी शिबिरात वैधकीय अधिकारी डॉ. देवांशी ससाणे आणि डॉ. मीनाक्षी रिंगने हे प्रमुख अतिथी होते ग्रामपंचाय सदस्य सौ मुक्ता सोनूले सौ. रंजना हनवते श्री निकेश भागवत श्री नानाजी बगडे श्री. बंडुजी निखाते सौ सविता गायकवाड सौ प्रतिभा दोहतरे सौ श्वेता भोयर सौ आशा नननावरे हे प्रमुख पाहुणे होते तर हे आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्या करता अंगणवाडी सेविका तसेच आशावर्कर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांचे योगदान लाभले..