अंगणातून दुचाकी चोरी करून जाळल्याचा आसुरी विकृतपणा

332

🔹बोरगाव धांडे येथील घटना

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.11 जानेवारी):- वर्षाचे शेवटच्या रात्रौ घरीअंगणात ठेवलेली मोटर सायकल चोरुन नेऊन ती गाव शेतालगत असलेल्या नाल्यात जाळून टाकण्याची कुटील आसुरी विकृत घटना पोलीस स्टेशन शेगाव बूज चे हद्दीतील भद्रावती तालुक्यातील बोरगाव धांडे या गावी नुकतीच घडली, 

बोरगाव धांडे येथील नीलकंठ महाकुलकर हे घटनेच्या रात्रौ पोलीस स्टेशनमध्ये असताना सकाळी त्यांच्या पत्नीने फोन वरून आपली मोटर सायकल होंडा ड्रीम युगा MH 34 BL1419 ही रात्रौच्या वेळी घरून चोरी झाल्याचे सांगितले, त्यानंतर गाडीचा शोधाशोध केल्यानंतर गावशेत लगत नाल्यात जळलेल्या अवस्थेत एक गाडी आढळून आली,पाहणीतून ती चोरी गेलेली मोटर सायकलच असल्याचे चेचीस व इंजीन नंबरवरून स्पस्ट झाले, त्यानंतर या घटनेची शेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केल्यानंतर पोलीस कर्मचारीनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली,  

संशयास्पद बाब ही की नीलकंठ महाकुलकर हा शेती व बोअरवेलचा व्यवसाय करीत असून दिनांक 31 डिसेंम्बर ला रात्रौ 9 नंतर ते चारचाकी माल वाहतूक गाडीने चालक ,मजूर सह बोअरवेल पाईप घेऊन शेगाव बूज कडे जात असताना वाटेत त्यांची मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावातील विकास धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची गाडी थांबवून चालकाला शिवीगाळ ,मारहाण केली, व चालक अमिनेश चेलेकर,नीलकंठ महाकुलकर व लालू मजूर या व्यक्तीविरुद्ध पो स्टे ला खोटी तक्रार दाखल केली,

त्याच रात्रौ तक्रार कर्त्याचे अंगणातून गाडी चोरून नेऊन ती जाळून नाल्यात टाकणे हीं बाब बुद्धिपुरस्पर आर्थिक नुकसान व मानसिक त्रास देण्याचे उद्देशाने केलेला विकृतपणा तर नाही ना?असा दाटसंशय घटनेच्या क्रमातून बळावतो आहे, तरी या घटनेची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार कर्ता नीलकंठ महाकुलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.