दुचाकी चोरून जाळपोळ करणारे आरोपी अखेर अटकेत 

🔹ठाणेदार मेश्राम यांची कौतुकास्पद कारवाई 

✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.23 जानेवारी) :- स्थानिक शेगाव बू हद्दीत येत असलेल्या बोरगाव धांडे येथे नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याच्या मध्य रात्री श्री नीलकंठ महाकुलकर यांच्या अंगणातून दुचाकी होंडा कंपनीची ड्रीम युगा mh 34BL 1419 या क्रमांकाची मोटार सायकल चोरी करून तिला गाव शेजारील नाल्यामध्ये जाळण्याचा जाणीव पूर्वक अघोरी प्रकार उघडकीस आला .  

       असल्याने याची माहिती पीडित महाकूलकर यांनी स्थानिक संबंधित शेगाव पोलीस स्टेशन येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्याशी घडलेला प्रकार सांगितला व तक्रार नोंद केली . तेव्हा या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक अधिक लक्ष केंद्रित करून ठाणेदार मेश्राम यांनी अधिक शक्कल लढवून काही दिवसातच आरोपीला अटक करण्यात यश प्राप्त केले .

पोलीस स्टेशन शेगाव बू अप. क्र. 10/23 कलम 379,435 भा. द. वी. आरोपी संदीप रामभाऊ लेडंगे वय 35 वर्ष राह.पाचगाव , व निकेश दुर्योधन ढोक वय 23 वर्ष राह. चंदनखेडा या दोघांना अटक करून ताब्यात घेतले. असता घडलेला सर्व प्रकरणाची आरोपींनी कबुली केली . करिता शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या या कडक कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून अनेकांच्या मते ही कारवाई कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे….

        सविस्तर असे की जुन्या वर्षाच्या शेवटच्या रात्री पीडित श्री महकुलकर यांच्याशि वाद गावातील काही लोकांशी शुलक कारणावरून घातला हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहचला यात विरुद्ध पार्टीचे लोक हे मद्यधुंद असल्याने एक मेकांना शिव्या देत होते . दरम्यान त्याच रात्री श्री महकुळकर यांच्या अंगणातून दुचाकी चोरून तिला जाळण्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला . 

     दरम्यान याची लेखी तक्रार देखील देण्यात आली होती याचीच दखल घेत ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी आपली अधिक शक्कल लढवली व दोन आरोपीला अटक करण्यात यश प्राप्त केले सदर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून उर्वरित आरोपीला देखील अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले .