रेती तस्करी करनारे दोन ट्रैक्टर जप्त

🔸शेगाव पोलिसांचे बेधड़क करवाई 

🔹१८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 डिसेंबर) :- स्थानिक शेगाव येथुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या पारोधी गांव लगत असलेल्या नदीतुन सर्रास पने रेतीची चोरी होत असुन गेल्या अनेक दिवसापासून शासनाच्या डोळ्यात धुळ झोपून सर्रासपणे या नदीतून रेतीची तस्करी होत होती याची गोपनीय माहिती शेगाव येथील पोलीस शिपाई श्री हरिदास चोपने व पोलीस शिपाई संतोष निषाद यांना माहिती मिळताच तस्करी स्थळ गाठून नदीतून रेतीची तस्करी होत असलेल्या ट्रॅक्टरला रंगेहात पकडून पोलीस स्टेशन येथे दाखल केले व आरोपीवर कारवाई केली.

सदर रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर चालक आशिष सुनील बावणे वय 23 वर्ष धंदा ड्रायव्हर तसेच अनिल कानोजी गायकवाड वय 32 वर्ष धंदा ड्रायव्हर चंदनखेडा यांच्यावर अपराध क्रमांक 392/ 2023 कलम 379,34,181(3)यांना अटक करून कारवाई करण्यात आली .

सदर या दोन्ही ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर क्रमांक नसून दोन्ही ट्रॅक्टर नवीन असून सदर हे ट्रॅक्टर श्री सुधीर मुळेवार चंदनखेडा व सुभाष जांबुळे यांच्या व मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. सदर ही करवाई येथिल टानेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शन खाली psi श्री महादेव सुरजुसे psi श्री महादेव सरोदे व इतर कर्मचारी अधिक तपास करित आहेत दोन्ही ट्रैक्टर सह रेती असा एकून मुद्देमाल पकडून १८ लाख १० हजार रूपए चा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

या कारवाईने परिसरातील सर्व रेती तस्कर यांचे धाबे दणाणले असून सर्वत्र या विषयावर चर्चा सुरू आहे. तेव्हा या पारोधी गाव लगत नदीतून तस्करी करणाऱ्या अशा अनेक रेती तस्करावर कठोर कारवाई होणे गरजेचे होते. परंतु यात संबंधित असलेले महसूल विभाग यांची कर्मचारी तसेच तहसीलदार महोदय भद्रावती यांची मात्र कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांच्या मते असंतोष निर्माण झाला आहे.

तेव्हा स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, हे वारंवार बघायची भूमिका घेऊन कसलाही प्रकारची कारवाई न करता यांना पाठबळ देत असल्याची गावकरी सांगतात तेव्हा या महसूल विभाग अधिकारी यांच्यावर येथील नागरिकांचा विश्वास उडाला असून रेती तस्करी करणाऱ्या तस्कर्यावर आवर घालण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी साहेब यांनी आवर्जून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.