कविता – काव्य म्हणजे अलंकारिक शब्दाची खाण होय . डॉ हेमचंद कन्नाके

277

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.१३ डिसेंबर) :- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील शेगाव बू. येथे नुकतेच कवितेचे घर यांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले.

नीरजा समूह म.राज्य व विकास गृप शेगाव बुज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ कवितेचे घर उद्घाटन सोहळा, बाल कविता संग्रह व निमंत्रित कवींचे कवी संमेलन असा बहारदार तिहेरी सोहळा शेगाव नगरीत संपन्न झाला.उद्घाटक मा.डॉ. हेमचंद गुरुदास कन्नाके (जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर) अध्यक्ष मा.डॉ. श्याम मोहरकर (समीक्षक चंद्रपूर) अतिथी मा. डॉ. प्रकाश महाकाळकर ( गट शिक्षणाधिकारी, भद्रावती) मा. श्री. बालाजी ढाकुणकर (मुख्याध्यापक नेहरू विद्यालय शेगाव बूज) प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. नंदिनी कन्नाके लिखित नीरजा स्वागत गीताने झाले. डॉ. हेमचंद कन्नाके यांनी फित कापून कवितेच्या घराचे उद्घाटन केले. प्रास्ताविक भाषणात नीरजा समूह प्रशासक नरेन्द्र कन्नाके यांनी 2017 पासून अविरत सुरू असलेले नीरजा समूह व विविध उपक्रम यावर प्रकाश टाकला.
कविसंमेलन मुळे जगण्यात विविधता व नावीन्यपूर्ण जीवन होते.कवीच्या अंतकरणातून निघणारी अलंकारिक शब्दरचना म्हणजे कविता असे उद्घाटक डॉ. हेमचंद कन्नाके यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी डॉ. प्रकाश महाकाळकर यांनी शैक्षणिक व साहित्यिक विषयावर वेगवेगळे उदा. च्या माध्यमातून आपले भाव स्पष्ट केले. मा. श्रीकांत पेटकर यांनी कवितेचे घर व त्या बद्दलची भूमिका स्पष्ट केली.

प्रा. प्रमोद नारायणे यांनी बाल कविता सांग्रहावर प्रकाश टाकून आधुकनिक युगात चांगले संस्कार घडविण्यासाठी पुस्तकाची गरज आहे. अध्यक्ष डॉ. श्याम मोहरकर यांनी वेगवेगळ्या काव्य प्रकार जरी असले तरी कवितेत अर्थ असणे आवश्यक आहे. नीरजा काव्य प्रकार गेल्या पाच वर्षात यशाच्या उंच शिखरावर पोहचले आहे तेव्हाच कुठे महाराष्ट्रातील नामवंत कवी संमेलनात प्रामुख्याने सहभागी होऊन साहित्याची सीमा वाढविताना दिसून येत आहे. पहिल्या सत्राचे सूत्र संचालन मा.श्री शिरीष दडमल (कवी.वरोरा) यांनी आपल्या वेगळ्या शैलीने रंगविले.
दुसरे सत्र निमंत्रित कवींचे कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.कवी संमेलनाध्यक्ष मा.श्री. दीपक शिव(कवी.आनंदवन) यांनी सर्व मान्यवर कवींच्या कविता अर्थपूर्ण व सुंदर होत्या. कवी हा समाजाचा प्रेरक आहे. आयुष्य उज्वल करण्याचे काम कविता करीत असते. सूत्रसंचालन मा. सौ.सीमा वैद्य (कवयित्री.वरोरा) यांनी सुमधुर आवाजात नीरजा,कविता,गजल,चारोळी घेत कवींना एका माळेत बांधून ठेवले.

यात प्रामुख्याने सौ. हिरा येसकर(कारंजा घा), मा. प्रकाश बन्सोड(आर्वी), मा. नेतराम इंगळकर (रामटेक), प्रशांत ढोले (वर्धा), सौ. निशा खापरे, मा.नागोराव सोनकुसरे ( नागपूर), प्रशांत झीलपे (सिंधी रेल्वे) राजश्री विरुळकर, मा. नरेन्द्र गंधारे, भाग्यश्री साबळे (हिंगणघाट ), मा. सुरेश डांगे (चिमूर), डॉ. सुधीर मोते, मा. प्रवीण आडेकर, मा. अनिल पिट्टवार, मा. प्रकाश पिंपळकर(भद्रावती),सौ. नंदिनी कन्नाके, मा. नीरज आत्राम, मा.ज्योती चन्ने, मा. गणेश पेंदोर(वरोरा) या सर्वांनी उत्कृष्ट रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. या मधूनच 3 उत्कृष्ट कवींची निवड करून त्यांना प्रत्येकी 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. प्रथम प्रवीण आडेकर, द्वितीय सौ. नंदिनी कन्नाके, तृतीय नरेन्द्र गंधारे अशा प्रकारे तिहेरी सोहळा रंगतदार व बहारदार झाले.

आयोजक नरेन्द्र गुरुदास कन्नाके
म.राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 ,मा.श्रीकांत पेटकर,(ज्येष्ठ मुंबई) सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…