🔸बिटरगांव पोलिसांची दमदार कार्यवाही, चोरट्यांना अठराव्या दिवशी अटक करून मुद्देमाल जप्त
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.25 ऑगस्ट) :- पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दि.४ आगस्ट २०२५ रोजी बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा ढाणकी येधुन दि.०२ आगस्ट २०२५ रोजी सोने तारण कर्ज पदभार असलेला कर्मचारी उमेश सुनिल वाघ रा. बेलखेड ता. उमरखेड याने त्याचा सहकारी रामेश्वर गजानन धुमाळे रा. बेलखेड यांचे मदतीने बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ढाणकी मधुन ३० सोने तारण पॉकीट ज्यामध्ये ५६५.१५ गाम सोने ज्याची किमंत ५७,००,००० रू आहे, सदर मुद्देमाल लॉकरचे कपाटमधुन दि. १५जुलै २०२५ ते दि. ०३आगस्ट २५ या दरम्यान चोरी करून अपहार केल्याची तक्रारदार मुग्धा विवेक देशपांडे विभागीय व्यवस्थापक, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी विभाग यवतमाळ यांनी तकार दिली होती. सदर आरोपीला अठराव्या दिवशी काल पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सदर गुन्हयाचे गांर्भीय पाहुन पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि पांडुरगं शिंदे ठाणेदार बिटरगांव यांनी आरोपी शोध कामी पथक नेमले होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोलीस कॉन्स्टेबल ९५२ प्रविण जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ११४१ रावसाहेब मस्के यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्या प्रमाणे गोपणीय माहीती व सायबर सेल यवतमाळ यांचे मदतीने गुन्हयातील फरार आरोपी १) उमेश सुनिल वाघ २) रामेश्वर गजानन धुमाळे रा. वेलखेड ता.उमरखेड यांना दि.२१ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले. त्या करीता पोस्टे पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड यांच्या पथकाचे या कामी सहकार्य लाभले. दोन्ही आरोपीस पोलीस स्टेशन बिटरगांव येथे आणुन तपास केला व आरोपीने गुन्हयात चोरी केलेल्या ५५५.१५ ग्राम सोने किमंत ५७,००,०००/- रू पैकी ५४१.१५ ग्रॅम सोन किंमत अंदाजे ५५,१९७३०/- रूपयेचा मुद्देमाल व गुन्हयात आरोपीने वापरलेली टू व्हीलर वाहण जप्त करण्यात आले. आरोपींना कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने ४ दिवासाची पोलीस कष्टडी रिमांड मंजुर केला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवि गिते, राहुन कोकरे, दत्ता हीगांडे, गोहन चाटे, पोलीस शिपाई प्रविण जाधव, रावसाहेब मस्के, प्रकाश मुंढे यानी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे व पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार हे करीत असल्याचे सूत्रांची माहिती आहे.







