वृक्षारोपण करून साजरा केला ओम नी आपला वाढदिवस

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .25 ऑगस्ट) :- येथून जवळच असलेल्या थोराणा येथील ओम मारोती तावाडे या चिमुकल्याने आपला सोळावा वाढदिवस तेथीलच जि. प. प्राथमिक शाळा परिसरात वृक्षारोपण करून साजरा केला आहे. त्यामुळे ओमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वरोरा येथील लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकत आहे. आधीपासूनच त्यानी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असे मनाशी त्याने ठरविले होते. समाजाला आपलेही काही देणे लागतो, या भावनेतून ओमचे वडील मारोती तावाडे यांनी वणी येथून फळझाडं आणि फुलझाडांची खरेदी केली. आणि आज ती झाडं शाळेला भेट देत उपस्थित मंडळी आणि बर्थडे बॉयच्या हस्ते लागवड करण्यात आली.

त्यानंतर शाळा परिसरात ओमचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाची भेट म्हणून ओमनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास बोदाडकर, मुख्याध्यापक अरुण उमरे, सुषमा भट, अंगणवाडी सेविका उज्वला बोदाडकर, उषा रिंगोले, मारोती तावाडे, देवेंद्र चोपणे, ओंकार तावाडे, रेणुका तावाडे, तुळसाबाई बावणे, हेमंत तावाडे, केतन भट, मारोती भट, डी. एन. वाभीटकर, विद्यार्थी, अंगणवाडीतील चिमुकली विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मंडळींनी ओमला वाढदिवसाच्या शुभकामना दिल्या अन् त्याचं कौतुकही केलं. ओमनी आपला वाढदिवस झाडं लावून साजरा केल्याने खरोखरच तो पर्यावरण मित्र ठरला आहे. त्यानी आपलं नातं निसर्गाशी जोडलं आहे. त्याचा हा वाढदिवस उपक्रम कौतुकास्पद आहे.