मृद जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्र्यांचा उद्या ‌महागाव तालुक्यांत अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव (दि.24 ऑगस्ट) :- संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह महागाव तालुक्यामध्ये 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत धरणाचे तेरा गेट उघडल्यामुळे पूसनदी, पैनगंगा नदी पत्रात पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड शेतपिकांचे नुकसान झाले. नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत शिवारातील झालेल्या नुकसानी संदर्भात पाहणी दौरा उद्या 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मृद जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांचा महागाव तालुका आणि उमरखेड तालुक्यात तातडीच्या दौऱ्याचेआयोजन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  उमरखेड तालुका व महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नदीकाठच्या शेत शिवारातील आणि इतरही शेतकऱ्यांची सर्व पिके पाण्या खाली वाहून गेले. फुलसांगवी येथील पन्नासच्या वर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने राहत्या घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा नियोजीत दौरा 25 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला आहे. सोमवारी 10-30 वाजता महागाव तालुक्यांतील भांब या गावी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. नंतर फुलसावंगी येथे सव्वा अकरा वाजता झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मंत्री महोदय यांचा ताफा नुस्कान ग्रस्त नागरिकांच्या घराची आणि शेतशिवारात झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

पालकमंत्र्याच्या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ,अधीक्षक अभियंता सिंचन विभाग यवतमाळ, अध्यीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, कार्यकारी अभियंता इसापूर प्रकल्प, जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ, जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग यवतमाळ, अधीक्षक अभियंता विद्युत वितरण विभाग यवतमाळ, उपविभागीय अधिकारी महसूल उमरखेड, तहसीलदार महागाव, गटविकास अधिकारी महागाव यांना या दौऱ्याबाबत तातडीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.महागाव आणि उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामधील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान व नदीकाठी शेती खरडून गेली, या बाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचा दौऱ्या संदर्भात पालकमंत्र्या सोबत नियोजीत कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना या दौऱ्यातून नुकसानी संदर्भातील समस्या निवारण होणार आहेत.

दोन दिवसाआधी नियोजीत ठरलेला कार्यक्रम काही प्रशासकीय कारणास्तव वेळेवर रद्द करण्यात आला. परंतु आता नव्याने 24 ऑगस्ट रोजी एका पत्र अन्वये कळविण्यात आले. महागाव, उमरखेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून झालेल्या नुस्कानिची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पालकमंत्र्याच्या या दौऱ्याच्या निमित्ताने आशा पल्लवीत झाल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा या दौऱ्या कामी सज्ज झाली आहे.