पोलीस निरीक्षक धनराज निळे यांचा महागाव शहरातील व्यापारी, नागरिकासह पत्रकाररांनी केला वाढदिवस साजरा

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव (दि.24 ऑगस्ट) :- पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी कायद्याचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढले. त्या मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात ठाणेदार धनराज निळे यांच्या बद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार झाली. 24 ऑगस्ट रोजी महागाव नगरीत विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस करण्यात आला.

    महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या घरगुती समस्या, आपसी समझोता करून सहकार्य केले. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन करून समजावून सांगून आपसी समझोता घडून आणला. त्यामुळे घरगुती गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले.त्या मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सहानुभूतीची वातावरण तयार झाले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शनी, महिलांसाठी वृक्ष भेट, मुलींसाठी सक्षम होण्यासाठी कराटे प्रशिक्षण अधिकारी सातत्याने केल्याने ते जनतेच्या मनामध्ये हवेहवेसे झाले आहे. त्यांचा आज 24 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्यामुळे महागाव परिसरात ठाण्यामध्ये, व्यापारी बाजार पेठेत व तसेच पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा याप्रसंगी सत्कार केला.नवयुवकांचे नेतृत्व नगरसेवक सुजित ठाकूर यांनी ठाणेदार धनराज निळे साहेबांना पेढा भरवित मनाभावातून वाढदिवस साजरा केला आहे.

त्या मुळे महागाव तालुक्यातील जनतेबद्दल बद्दल निळे साहेबांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. महागाव तालुक्यातील लोकं खराब आहेत,असे अधिकाऱ्यांच्या मनातील गैरसमज आहेत.परंतु असे काही नसून आपण जनतेला काय देतो व सर्वसामान्य माणसात कसे वागतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून शांत, संयमी स्वभावाचे सर्व सामान्य माणसाच्या मना मध्ये घर करणारे ठाणेदार धनराज निळे असे अधिकारी महागावला स्टेशनला लाभले हे धान्य झाले. ठाणेदार यांनी आमच्या पत्रकारांना संवाद साधताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय देता यावा हीच त्यांनी इच्छा प्रगट केली.हा माझ्या जीवनातील माझ्या कामाबद्दल मला मिळालेली सर्वात मोठी पावती असल्याचे भावनिक उद्गार पोलीस निरीक्षक धनराज निळे साहेब यांनी काढले.असेच चांगले काम माझ्या कारकिर्दीत घडावे व तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी जातीय दंगे घडू नये.

सर्व नागरिकांचा असाच सहवास मला मिळावा. हीच यावेळी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे उद्गार धनराज निळे साहेबांनी काढत यावेळी सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन स्वीकारून सर्व नागरिक पत्रकार व व्यापारी बांधवाचे मनापासून आभार व्यक्त केले.