🔸 चिल्ली दरोड्यातील मुद्देमाल परत घेण्यास फिर्यादीचा नकार
🔹मुख्यमंत्र्याकडे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि .15 ऑगस्ट) :- तालुक्यात चिल्ली (ई.) येथील संतोष मनोहरराव पांडे यांच्या शेतातील वाड्यात 8 जुलै 2024 रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. पोलिसांनी दरोड्यातील सहा आरोपींना अटक केली हे आरोपी सध्या कारागृहात आहेत. मात्र दोन पसार आरोपी वर्ष उलटूनही पोलिसांच्या हाती लागले नाही.
दरोडेखोराणी एक किलो सोने व इतर रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार आहे. त्या दरोड्यामध्ये आरोपींकडून सात लाख आणि आठ तोळे सोने जप्त केले. मुद्देमाल सुप्रुत नाम्यावर परत घेऊन जावा असे सांगितले असले तरी फिर्यादीने तफावतीमुळे नकार दिला आहे.
महागाव पोलिसांनी जप्त केलेले सोने आपले नाही. चोरी गेलेल्या सोन्याचे वर्णन आणि जप्तीतील सोने या मधील वरील तफावत आहे. जप्ती मध्ये केवळ आठ तोळे सोने दाखविले असून एक किलो सोने जप्त केले नाही,असे फिर्यादीचे म्हणणे आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केल्यानंतर मुंबईतील एका सराफा कडून दरोड्यातील सोने जप्त केले ते एक किलो न दाखवता आठ तोळे जप्त दाखवले. मात्र सराफावर कुठली कार्यवाही न करता परस्पर सोडून दिले. चोरी गेलेल्या सोन्याच्या वर्णन ऐवजी आठ तोळे सोने गोळा तयार करून घेण्यात आला. ही बाब फिर्यादीने अमान्य केली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे.
मुंबईच्या सरापाला परस्पर सोडले;
(चिल्ली ( ई. ) येथील पांडे कुटुंब हे जमीनदार आहेत. जुन्या वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आहे. या हेतूने दरोडेखोरांनी अनेक दिवस पाळत ठेवून सशस्त्र दरोडा टाकून महिलांना जबर मारहाण करून रोख रक्कम आणि सोने लंपास केले. या प्रकरणात सुरुवाती पासूनच पोलीस भूमिका संशयास्पद राहिली आहे. मुंबई येथील चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला परस्पर सोडून देण्यात आले.हा संशय अधिक गडच झाला आहे).
पांडे म्हणतात जीवाला धोका;
(दरोड्यातील दोन मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. कंधार आणि परभणी या ठिकाणी ते खुलेआम फिरत आहेत.त्या आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असल्याचे पांडे कुटुंबीय सांगत आहेत. मुख्य आरोपी प्रसार असतांना आणि एक किलो सोने व रोख रक्कम जप्त झाले नसतांना पोलिस शांत कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे).
(दरोडा प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्याकडे झाली आहे. सहा आरोपीला अटक केली असून दोन प्रसार आहेत. सात लाख रुपये रोख आणि आठ तोळे सोनं जप्त केले आहे. फिर्यादीने सुप्रुदनाम्यावर मुद्देमाल घेऊन जावा अशी विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला आहे)….धनराज निळे,पोलिस निरीक्षक महागाव पोलीस स्टेशन







