🔹मागील वर्षी जलपर्णी साफसफाईच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे टेंडर पास करीत अनियमितत्ता झाल्याची आरटीआय कार्यकर्त्याची तक्रार
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.11 ऑगस्ट) :- तीन दिवसांपूर्वी पुसद येथे झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे पुस नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात पाणी आल्याने पाण्याच्या प्रवाहात खुप मोठ्या प्रमाणात लाकडांची खोडे, कचरा वाहून आला आहे. अधरपुस प्रकल्पात खुप मोठ्या प्रमाणात जलपर्णी नावाची वनस्पती धरणाच्या मुख्य भीतीं जवळ म्हणजे साडंव्याच्या गेटवर येऊन आडकली आहे. मागील वर्षी आडकलेली ही वनस्पती धोकादायक होऊ नये, म्हणून सिंचन विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च दाखवून अवघ्या काहीच तासात साफसफाईचे काम करून कोट्यावधी रुपये अधिकाऱ्यांनी घशात घातल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे.
मृग नक्षत्राच्या सुरवातीला साफसफाई करूण संभाव्य धोके टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या नावाखाली आंध्र प्रदेशातल्या टी ट्वेंटी जेसीबी मशिनरीज द्वारे जलपर्णी खोडे काढण्याचे काम करण्यात आले. पाच पन्नास हजार रुपयाच्या कामासाठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर पास करून संबंधित विभागाच्या अभियंत्याद्वारे अनियमिततेचा प्रकार झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे. पुन्हा आता तीच समस्या समोर आलेली निर्माण झाली आहे. पावसाळा संपण्यासाठी दोन महिने कालावधी आहे. चालू असलेल्या आगस्ट आणि पुढील सप्टेंबर महिन्यात आचानक मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाल्यास सांडव्यातुन पाणी सोडणे अथवा बंद करणे आवघड व धोकादायक होऊ शकते.
या ठिकाणी जमा होत आसलेल्या केरकचरा लाकडी खोडे व जलपर्णी वनस्पतींच्या आवशेषात वाढ होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही क्षणी धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने व विभागाच्या आमदारांनी तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा पद्धतीची मागणी गोविंदराव देशमुख सवनेकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे. मागीलवर्षी काढण्यात आलेली जलपर्णी, लाकडी खोडे, कचरा करण्यासाठी करोडो रुपयांचे टेंडर पास करून जलपर्णी काढण्याच्या नावावर येथील अभियंता अविनाश भगत यांनी वरिष्ठांना मॅनेज करीत प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार आयटीआय कार्यकर्ता संजय नागरगोजे यांनी संबंधिताकडे केली.
बातम्या स्थानिक प्रसीध्दी माध्यमातून झळकल्या होत्या, काही वृत्तपत्रांमध्ये बातम्यांतून झालेला भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी मॅनेज करण्यात आल्याची पंचक्रोशीत चर्चा गाजली होती. आता अभियंत्याद्वारे परत भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ही दुसरी संधी आपसुकच निर्माण झाल्याचा परिसरातून चर्चा होताना दिसते आहे.







