✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा (दि.11 ऑगस्ट) :–
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. महिला पतंजली योग समितीच्या वतीने दिनांक 10 ऑगस्ट रोजी भवानी माता मंदिर सभागृहात सर्व योगसाधकांना राखी बांधून हा सण उत्साह, आनंद आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात महिला भगिनींनी प्रेम, स्नेह आणि ऐक्याचे प्रतीक असलेली राखी बांधून परस्परांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी श्री. एम. के. सेलोटे, प्रा. दत्तात्रय मोरे, प्रभाकर चन्ने, बापूजी पाटील रोगे, शिवकरण खदाव, श्री. दत्तात्रय येरावार, संजय श्रीकोंडवार, अनिल पंदीलवार उपस्थित होते.
महिला पतंजली समितीच्या तालुका प्रभारी सौ. सोनल चिडे यांच्यासह श्रीमती चंद्रकला खंडाळे, सौ. अरुणा गावत्रे, सौ. संतोषी खदाव, सौ. नीलिमा सेलोटे, सौ. गणपती चौधरी, सौ. प्रयाली येरावार, सौ. वनीता उराडे, सौ. छाया कासवटे, प्रभुदास वनकर, सौ. येगीनवार, सौ. सुनीता सातपुडके व इतर भगिनींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी एकत्रितपणे सण साजरा करत आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश दिला.







