फुलसावंगी येथे सर्वपक्षीय व्यापारी संघटनेच्या कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)

महागाव (दि.9 ऑगस्ट) :- तालुक्यातील फुलसांगवी बाजारपेठ परिसरात नावलौकिकास आलेली बाजारपेठ आहे. मागील अनेक दिवसापासून या ठिकाणी अवैध धंद्ये मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.

सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणाची धिंडवडे काढले जात आहेत. गुरुवारी येथील व्यापाऱ्यांच्या घरावर मोठा दरोडा पडल्याचे उघड‌ झाल्यापासून व्यापाऱ्यांना आपल्या मालमत्तेबद्दल असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. व्यापाऱ्यांच्या घरात झालेली प्रचंड धाडसी चोरीमुळे गावकऱ्या तसेच व्यापाऱ्यात दहशत आणि भिंतीचे वातावरण निर्माण झाले. अवैध धंद्याच्या विरोधात शनिवारी फुलसांगवी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून कडकडीत बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता, त्यामुळे दिवसभर बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाला होता.

    फुलसांगवी ही परिसरात नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.या बाजार पेठेच्या ठिकाणी दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रशासन कुचकामी ठरत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शांतता व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्याने येथील सर्वपक्षीय व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन 9 ऑगस्ट रोजी वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात कडकडीत बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना आव्हान करण्यात आले होते.

फुलसांगवी ग्रामपंचायतच्या सरपंच्या सारजाबाई वाघमारे, कुणाल नाईक , तंटामुक्ती अध्यक्ष योगेश वाजपेयी, रवींद्र पांडे अध्यक्ष भुसार व्यापारी संघटना, निलेश चौधरी अध्यक्ष कृषी केंद्र संघटना, बाळू चौधरी अध्यक्ष जनरल स्टोअर्स संघटना, बाबू पठाण अध्यक्ष हॉटेल संघटना, दीपक जाधव अध्यक्ष मोबाईल गॅलरी संघटना, गजानन भडांगे अध्यक्ष हार्डवेअर संघटना, गुलाब भडांगे अध्यक्ष किराणा असोसिएशन, विवेक पांढरे अध्यक्ष पत्रकार संघटना, तानाजी शिंदे अध्यक्ष पत्रकार संघटना, शिवप्रकाश डोंगरे अध्यक्ष चर्मकार संघटना, श्याम पाचंगे अध्यक्ष कपडा मार्केट संघटना यांच्या सोबत सर्व पक्षी संघटनेने कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता, त्यामुळे बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.