अनुलोम संस्थेद्वारे निजधाम आश्रम शाळेत संविधान जनजागृती

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)

महागाव(दि.9 ऑगस्ट) :- 

अनुलोम संस्थेद्वारे 8ऑगस्ट रोजी संविधान निर्मितीच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधत महागाव तालुक्यातील मुडाणा येथील निजधाम आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. होऊ घातलेल्या कार्यक्रमासाठी अनुलोम संस्थेच्या माध्यमातून वक्त्यांनी विद्यार्थ्यांना संविधाना बद्दल सखोल माहिती दिली.

   भारतीय संविधान हे भारताचे मूलभूत आणि सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे. 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान सभेत ते स्वीकारले. संविधाना बाबत अक्षय फुलारी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान अंमलात आले. ज्या मुळे भारत देश एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आहे. संविधान भारताच्या सरकारची रचना, कार्यपद्धती, अधिकार आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य निश्चित करते. भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ज्या मध्ये 448 कलमे 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. प्रजासत्ताक आणि संसदीय लोकशाहीत भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. जिथे जनता आपल्या मर्जीने लोकप्रतिनिधींना निवडते. घटनेने नागरिकांना सहा मूलभूत अधिकार दिले आहेत. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपायांचा अधिकार असल्याचे स्पष्टीकरण केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वक्त्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनविले आहे. ते आपल्या भारतीय संस्कृतीतील स्वतंत्र, समता, बंधुता या तत्त्वावर आधारित असल्याचे यावेळी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उमरखेड येथील अक्षय फुलारी यांनी अनुलोम संस्थेच्या माध्यमातून सदर संविधान विषयक मार्गदर्शन उपक्रम निजधाम आश्रम शाळा मुडाणा या ठिकाणी राबविले आहे. अनुलोम संस्थेने अशा पद्धतीने अनेक उपक्रम राबविले आहेत. उमरखेड तालुका जनसेवक आशिष विश्वंभरी व त्यांचे सहकारी विष्णू वानखेडे यांच्या माध्यमातून कार्यक्रम लावण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास भिमटे पाटील हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी बापू, निजधाम आश्रम शाळेचे अध्यक्ष परसरामजी वानखेडे, मुडाना येथील भाजपा कार्यकर्ते भाऊ ठाकरे यांची उपस्थिती होती. या वेळी निजधाम आश्रम शाळेचे शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.