✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.5 ऑगस्ट) :- राज्यामध्ये मागील काही वर्षापासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात माहिती समोर आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका घेण्यात येण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिला आहे. ह्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर आता गाव पातळीवरच्या खुंटलेल्या विकासाची गती वाढणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिपवाळी दरम्यान येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. आता गाव खेड्यातून पुढाऱ्यांचा पक्षाकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरूवात केली जात आहे. दिपवाळीनंतर निवडणुका होण्याचे निश्चित झाल्याने ग्रामीण भागात कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. मागील अनेक वर्षापासून ह्या निवडणुका लांबल्या होत्या. त्यामुळे विकास कामाला खिळ बसली होती. जिल्हा परिषद सदस्यांना आमदारा प्रमाणे विकास कामासाठी फंड मिळत होता.
त्या मुळे ग्रामीण भागाचा विकास होत होता. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका मुळे विकास कामांना गती मिळणार आहे. महागाव तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट असून दहा पंचायत समिती गण आहेत. या वर्षी एका गटाची नव्याने निर्मिती होणार असून या मध्ये मुडाना किंवा माळकिन्ही गटाचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







