गुंज येथे महाराजस्व अभियानांतर्गत विवीध प्रमाणपत्रांचे वितरण

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)

महसुली सप्ताहा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत कार्यालय गुंज या ठिकाणी 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आले. समाधान शिबिर अभियानांतर्गत ग्रामस्थांसह निराधार व्यक्ती,अपंग, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. 

   या अभियानात नागरिकांना, विद्यार्थीनींना, निराधार व्यक्तींना विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले. सदर अभियानात शेतकरी वर्गांना कृषी क्षेत्रातील विविध योजनेची माहिती कृषी मंडळ अधिकारी राजेंद्र फाळके यांनी दिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संदीप मानकर मंडळाधिकारी यांची उपस्थिती होती. महसूल विभागाअंतर्गत देण्यात येणारे विविध दाखले व विविध योजनेची माहिती महागाव तहसीलचे नायब तहसीलदार गजानन पराते यांनी दिली.

या वेळी विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वितरीत करण्यात आली. या अभियाना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार गजानन पराते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गुंज येथील सरपंच्या पुष्पाबाई कांबळे,पोलिस पाटील कांबळे, कृषी मंडळ अधिकारी राजेंद्र फाळके, ग्रामपंचायत अधिकारी एम. एन. वाडगे गावातील प्रतिष्ठित नागरिक रामेश्वर पवार यांचे सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या समाधान शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी पी.जे. निवल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रद्धा राठोड यांनी मानले. 

सदर कार्यक्रम ग्राम महसूल अधिकारी खोसे, डि.बि.चव्हाण, श्रद्धा राठोड, एस. व्हि. रायपूरकर, पी.जे. निवल, अंकुश उईके सह महसूल सेवक राहुल साळसुंदर, ए. के. डोंगरे, दत्ता हेंगडे,पी. ए.पाटील, किसन दोडके यांनी परिश्रम घेतले.

 महसुली सप्ताह अंतर्गत होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये एकाच छताखाली विविध दाखले मिळाल्याने गुंज मंडळातील अनेक लाभार्थ्यांनी शासनाच्या या उपक्रमाला धन्यवाद दिले.