महागाव तालुक्यात नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टर मधून सर्रास रेतीची चोरटी वाहतूक

🔹महागाव पोलिसांनी तीवरंग येथील रेती चोरट्यावर केली कार्यवाही

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव (दि.4 ऑगस्ट) :- तालुक्यात नदी नाल्यातून प्रचंड प्रमाणात रेतीची तस्करी चालू आहे. यामध्ये बिना नंबर प्लेटच्या वाहनांमधून वाहतूक होत असल्याचा महागाव पोलिसांना सुगावा लागला. नागपूर तुळजापूर हायवेवर धनोडा उड्डाण पुलावर आज सोमवारी ही कार्यवाही महागाव पोलिसाद्वारे करण्यात आली.

     राज्य महामार्ग 361 नागपूर तुळजापूर वर धनोडा उड्डाणपूल वरून अवैध तिवरंग येथील दोन चोरटे एका ट्रॅक्टर द्वारे रेतीची चोरटी वाहतूक करतांना महागाव पोलिसांच्या रंगेहात तावडीत सापडले. सचिन प्रल्हाद राठोड रा. तीवरंग असे चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. सदर ट्रॅक्टर अंबादास शिंदे रा. तीवरंग यांच्या मालकीचे असून ट्रॅक्टरचा चेचीस नंबर BZCSR1006229 S 3 यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती, आणि ट्रॉलीसहित ट्रॅक्टर किंमत 40000 लाख रुपये आणि एक ब्रास रेती 6000 असा सर्व चार लाख सहा हजारांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरील कार्यवाही महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांनी केली आहे. 305 (E) 3(5) भारतीय न्यायसंहिता सह कलम 48(7),( 48) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे.