✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.4 ऑगस्ट) :- यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावात बुलढाणा अर्बन कॉपरेटिव बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेले सोने परस्पर विक्री केल्याची घटना घडली आहे. 28 लाखांच्या वर ग्राहकाने सुरक्षित ठेवलेले सोने बँक कर्मचाऱ्यांनीच लंपास केल्याने बँकेच्या ग्राहकात एकच खळबळ उडाली आहे.
बँकेतून काढलेले सोने एका प्रतिष्ठित सोनाराच्या दुकानात विक्रीकरत असतांना त्याच दुकानात बनवलेले सोन्याचे दागिने कोणाचे होते ते त्या सोनारला माहीत असल्याने त्यांने त्या मालकाला फोन करून विचारणा केली, की तुम्ही विक्रीसाठी हार पाठवला का ? तेव्हा त्या माणसाने आपले दागिने बुलढाणा अर्बन बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती दिली.
मग बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागीने सोनाराच्या दुकानात आले कसे ? या बद्दल शहानिशा केली. बँकेच्या लॉकर मधून 28 लाखापेक्षा जास्त किंमतीचे सोने परस्पर विक्री केल्याचे लक्षात आले. त्या मुळे ग्राहकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. ढाणकी येथील नागरिकांनी बँकेतून पैसे आणि लोकर मधील दागिने काढण्याचा सपाटा सुरू केला. संबंधित चोर कर्मचारी फरार असल्याचे कळते. या मुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशा अनेक लहान मोठ्या पतसंस्था निर्माण झालेल्या आहेत.
ह्या पतसंस्था सुद्धा कोणत्या दिवशी गायब होतील हे सांगता येत नसल्यामुळे नागरिकांनी आपले पैसे नॅशनलाईज बँकेत ठेवलेच सोयीचे होईल, इतर बँकेत पतसंस्थेत ठेवणे धोक्याचे असल्याची चर्चा होत आहे. काही राजकीय पुढारी – माजी आमदारांच्या सुद्धा पतसंस्था आहेत. आणि त्यांनी राजकारणातील विश्वासअहर्ता गमावल्यामुळे त्यांच्या पतसंस्थेचे भविष्य काय अशीही कुजबुज ऐकायला मिळत आहे ? ढाणकी मध्ये यापूर्वी राजस्थानी पतसंस्था – राजलक्ष्मी पतसंस्थेचा सुद्धा असाच घोटाळा झालेला आहे. त्या मुळे नागरिकांचे पैसे व दागिने आता सुरक्षित कोठे ठेवता येतील हा प्रश्न सध्या ग्राहकांना विवंचनेत पाडणारा झाला असल्याची जोरदार चर्चा होत आहे. आशा पतसंस्था व कॉपरेटिव्ह बॅंकाचे भवितव्य अंधकारमय होत चाललेले असून नागरिकांनी आपले पैसे सध्यातरी नॅशनलाईज बँकेमध्ये ठेवावे असे सुज्ञ नागरिकांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.







