🔸विद्यार्थिनींनी नेहमी सजग राहिले पाहिजे ; स.पो.नि. सरस्वती राठोड
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.31 जुलै) :-
स्थानिक सावित्रीबाई कन्या विद्यालय महागाव येथील विद्यार्थीनींना आपल्या सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन करतांना महागाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या विद्यार्थिनींना आपण नेहमी तत्पर राहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता ती स्पष्टपणे शिक्षिका किंवा आई यांना सांगितली पाहिजे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रतिभा मेश्राम ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस कर्मचारी जयश्री राठोड, शिक्षिका दीपिका, देसाई, वर्षा ब्रह्मटके, भारती पाटील आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना राठोड मॅडम पुढे म्हणाल्या की, कुटुंबात राहताना व प्रवासात फिरतांना गुड टच व बॅड टच याची जाणीव विद्यार्थिनींना असली पाहिजे. संकट समई 112 या नंबरवर त्वरित कॉल करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. तसेच त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा विद्यार्थिनींना देऊन वेळप्रसंगी मला स्वतः कॉल करा असे सांगून हिम्मत दिली. या वेळी जयश्री राठोड यांनी तुम्हाला अडचण असली तर मला कॉल करा मी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमची अडचण ऐकून घेईल. व त्या अडचणीवर उपाययोजना करून तुमचे कुठेही नाव येवु देणार नाही. तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य मेश्राम यांनी आमच्या विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी ह्या बाहेरगावावरुन येजा करतात, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मानव विकास मिशन, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत महामंडळाच्या बसणे प्रवास करतात. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला बस स्थानकावर सुरक्षिततेसाठी सहाय्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धात्रक तर आभार श्रीकांत कदम यांनी मांनले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.







