राजुरा येथे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिमेचा शुभारंभ

🔹आमदार देवराव भोंगळे यांच्याहस्ते उदघाटन: रुग्णांना इतर साहित्याचे वाटप

✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि .23 जुलै) : – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्य संपूर्ण महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने एक महिना विशेष मोहीम राबविण्याचा शुभारंभ आज राजुरा येथिल उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून उदघाट्न करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बेबी किट व मच्छरदाणी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे (दि. २१) रोज मंगळवारला सकाळी दहा वाजता आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते रुग्णालयातील गर्भवती महिलांना मच्छरदानी व लहान बालकांना बेबी किटचे वाटप करून साजरा करण्यात आला. एक महिना सुरु असणाऱ्या मोतीबिंदू मुक्त विशेष मोहिमेचा शुभारंभ यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक अशोक जाधव यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते केला.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक अशोक जाधव, वैद्यकीय अधिकारी लहुजी कुळमेथे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे शहर अध्यक्ष सुरेश रागीट, महिला अध्यक्ष मायाताई धोटे, बाळनाथ वडस्कर, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रफुल घोटेकर, सचिन डोहे, आकाश गंधारे, मंगेश श्रीराम, ऍड. नितीन वासाडे, सचिन भोयर, राजकुमार डाखरे, विनोद नरेन्दुलवार, प्रिती रेकलवार, ममता केशेट्टीवार, सारीका शहा, पुणम शर्मा, स्वरुपा झंवर, भाऊराव बोबडे, किशोर रागीट, बाबा बेग, सागर भटपल्लीवार, मंगल चव्हाण, योगिता भोयर, प्रदीप मोरे, मंगल, मिथुन थिपे, अंकुश कायरकर, छोटू मसादे, मनोहर निमकर, छबिलाल नाईक, आकाश चिंचाळकर, मयुर बोनगिरवार, आसिफ सय्यद, महेंद्र बुरडकर, अभिजित कोंडावार, वैभव पावडे, रोशन बंडेवार, महेश झाडे, रमाकांत निमकर, अमित डांगे, चेतन काटोले, मनोज मून, शुभम सुर्यवंशी, शुभम राखुंडे, आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.