राजुरा तालुका शालेय क्रीडा समितीची सभा संपन्न

🔸शालेय क्रीडा स्पर्धेला ११ ऑगस्ट पासून होणार सुरुवात

🔹राजुरा तालुक्याचे नावलौकिक देश पातळीवर पोहोचवा.- संदीप उईके, क्रीडा अधिकारी 

✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि .23 जुलै) :- 

           क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत राजुरा तालुका क्रीडा समिती द्वारा शालेय क्रीडा स्पर्धा संदर्भात राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक २२ जुलै रोजी सभा संपन्न झाली. क्रीडा अधिकारी चंद्रपूर संदीप उईके यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून हरिश्चंद्र विरुटकर , राजुरा तालुका क्रीडा संयोजक , किशोर चिंचोलकर , भास्कर फरकाडे, प्रभाकर साळवे , राजू डाहुले, राजेश लांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र विरुटकर यांनी केले तर आभार बादल बेले यांनी मानले. तालुका स्तरावर दहा प्रकारच्या शालेय क्रीडा होणार आहेत. त्यासंदर्भात आभासी पद्धतीने विद्यार्थांची नोंदनी करणे, जुन्या विद्यार्थ्याना प्रमोट करणे, खेळाडूंची नोंदणी करून बँकेत शुल्क भरणे, खेळाडूंचे ओळखपत्र काढणे तसेच शालेय क्रीडा संदर्भातील नियम व अद्ययावत माहिती या सभेत देण्यात आली. राजुरा तालुक्यातून शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी देश पातळीवर नावलौकिक करावे असे आवाहनही क्रीडा अधिकारी संदीप उईके यांनी यावेळी केले. सभेला हर्षल क्षीरसागर , एम.एच.सर्जेकर, ए . एम.कवाळे, भार्गवी कोडाली, चैताली कन्नाके, पी. एस. श्रीरामे, प्रमोद ढाफरे, जोगेंद्र नळे, बंडू ताजने, महेंद्र चौधरी ,इकबाल शेख, स्वप्निल डंभारे आदींसह राजुरा तालुक्यांतील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक उपस्थीत होते.

हरिश्चंद्र विरुटकर, राजुरा तालुका शालेय क्रीडा स्पर्धा समिती संयोजक 

                 चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर दहा प्रकारचे शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. यासंदर्भात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये वेळापत्रक तयार करण्यात आले असून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा संपन्न होतील हा विश्वास आहे. या शालेय स्पर्धांमध्ये वयोगट १४,१७,१९ मधील मुले, मुली मोठ्यासंखेने सहभागी होतात.

यावर्षी पासुन मिळणार तालुका स्तरावरील प्रमाणपत्र. विद्यार्थी खेळाडू नोंदणी करताना अचूक आधार नंबर भरणे अनिवार्य. 

मागिल वर्षी पासुन आमदार देवराव भोंगळे यांनी तालुका स्तरावरील विजयी व उपविजेता विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन एक नवीन ऊर्जा व प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू केले आहे.