कोरपना प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्याचा निकाल

🔸चेक बाऊन्स प्रकरणी दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10 जुलै) :-

                स्थानिक राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेमधून गडचांदुर चे सभासद शेख अब्दुल अजीज यांनी दिनांंक 14 मे 2012 रोजी 60 हजाराचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. पतसंस्थेने वेळोवेळी कर्जाची परतफेड करण्यासाठी सभासदाला सांगितले. त्यानंतर त्यांनी दि. 9 जुलै 2014 ला यवतमाळ अर्बन को. ऑप बँकेचा 86 हजार 866 रुपये रक्कमेचा चेक दिला. सदर चेक पटविण्यासाठी पतसंस्थेने बँकेत टाकला असता दि. 17 जुलै 2014 ला परत आल्याने चेक अनादर प्रकरणी पतसंस्थेनी कोरपना न्यायालयात प्रकरण दाखल केले. या प्रकरणाचा प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यानी दिनांक 28 मे 2025 ला निकाल दिला आहे.

            यात कर्जदार सभासदाला 1 लाख 45 हजार 128 रुपयांचा दंड व सहा महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मुदतीत रक्कमेचा भरणा न केल्यास आणखी एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालाने थकबाकीदार कर्जदारांना चांगलीच चपराक बसली आहे व यापुढे कर्ज चुकवेगिरी करणे कर्जदार सभासदांना महागात पडणार आहे.