✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.10 जुलै) :- अ.भा.डाकसेवक संघटनेद्वारे दिनांक 9 जुलैच्या राज्यव्यापी संपात सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा मुख्य पोष्ट कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शन केले. या संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोष्ट ऑफिस चे कार्य ठप्प झाल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.
या आंदोलनात पोस्टमन ग्रुप डी संघटनेचे चंद्रपूर सचिव राजू गोरे, प्रवीण माथनकर, साईनाथ भांडेकर, ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष पंढरी झाडे, सचिव प्रणय देवावार, पद्माकर टोंगे ,सुनील भोपये , मुरलीधर बोडखे, राजू धोटे, भारती करंडे यांचेसह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले.







