✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.21 सप्टेंबर) :- माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शिफारसी नुसार जालना महानगरच्या सरचिटणीस पदी अमोल कारंजेकर यांची नियुक्ती करण्यात आली अमोल कारंजेकर यांनी आतापर्यंत पक्षात दिलेल्या कार्याची व योगदानाची दखल घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीचे पत्र भाजपा विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस सिद्धी भाऊ मुळे, महानगर प्रमुख अशोक अण्णा पांगारकर तसेच प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे पाटील, निमंत्रित सदस्य विजयजी कामड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्तीबद्दल अमोल कारंजेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






