डॉक्टर , इंजिनियर , उद्योजक, साहित्यिक व समाज सेवक प्रविण मधुकर उपलेंचवार यांना भारतातील सर्वात मोठा सामाजिक पुरस्कार प्रदान 

✒️ सुनील भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.8 ऑगस्ट) :- नुकतेच कामानि सभा गृह नवीन दिल्ली येथे एका भव्य समारोहात डॉ ,इंजिनियर ,उद्योजक, साहित्यिक व समाजसेवक प्रविण मधुकर उपलेंचवार, नागपूर यांना मोठ्या राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय मान्यवर पाहुन्याचे हस्ते राष्ट्रीय प्रतिमा पुरस्कार ( national icon award ) हा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार , भारत न्यूज या वृत्त वाहिनी द्वारे व भारत यूवा वेलफेअर असोसिएशन द्वारे आयोजित कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास राजनाथसिग जी केंद्रीय रक्षा मंत्री , रामदास आठवले जी केंदीय मंत्री, vindu दारा Singh चित्रपट अभिनेता, डॉ संजीव सावने आंतरराष्ट्रीय संशोधक , अरहम sawant हिंदी चित्रपट अभिनेता व इतर अनेक खूप मोठे विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित असून कार्यक्रमाचि शोभा वाढवीत होते. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन हे अतिशय शानदारपणे व भव्यपणे करण्यात आले होते व एवढे मोठे सभागृह प्रेक्षकानी खचाखच भरले होते .

    डॉक्टर इंजिनियर प्रविण मधुकर उपलेंचवार हे नागपूर शहर ,महाराष्ट्राचे रहिवासी असून मागील 35 वर्षांपासून यशस्वी उद्योजक आहेत. ते सुप्रसिद्ध साहित्यिक असून त्यांनी आतापावेतो 175 पेक्षा जास्त कविता लिहून विविध कार्यक्रमात सादर केलेल्या आहेत .तसेच सुसाट ही 400 पानाची कादंबरी पण लिहिली आहे व तरंग मेंदीचे या अल्बममध्ये 18 गीते लिहून त्याला संगीत पण दिलेले आहे .सध्या ते विदर्भ प्रांत पाल हे मराठी साहित्य मंडळ या राष्ट्रीय संस्थेचे पद सांभाळून त्यांच्या कारकीर्द मध्ये नागपूर येथे प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा असे मोठे कार्यक्रम त्यांच्या सहकारयाच्या सहकार्याने यशस्वी पणे आयोजित करण्यात आले होते. तसेच त्यांचा दरवर्षे 900 गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत/ अत्यल्प खर्चात संपूर्ण शिक्षनासाठी काम करणार्‍या त्यांच्या वडीलांच्या संस्थेत नित्य सहभाग असतोच.

 प्रविण मधुकर उपलेंचवार यांना अमेरिकेतील नामांकित विद्यापीठा तर्फे मानद. डॉक्टरेट त्यांच्या व्यावसायिक व साहित्य क्षेत्रातील वाटचाली साठी देण्यात आली आहे.

    या आधी पण प्रविण मधुकर उपलेंचवार यांना त्यांच्या व्यावसायिक ,साहित्यिक व समाजसेवक या तिन्ही क्षेत्रातील मोठ्या कामगीरि साठी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारानि सन्मानित करण्यात आले असून ती यादी लांबलचक असून ती येथे नमूद करणे कठीणच आहे. श्री प्रविण मधुकर उपलेंचवार हे आपल्या अनेक वर्षांपासून च्या वाटचालीने नागपूर शहरा चा व महाराष्ट्राचा गौरव संपूर्ण देश व विदेशात वाढवीत आहे असे त्यांच्या अनेक चाहत्यांचे म्हणणे असून या पुन्हा , भारतातील सर्वात मोठ्या सामाजिक नवीन पुरस्कारामुळे त्यांचे चहूकडे कौतुक होत आहे.