🔸वरोरा शेगाव चिमूर मार्गावरील खड्डे तर बुजले परंतु रस्त्याचे काय

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.8 ऑगस्ट) :- वरोरा शेगाव चिमूर महामार्गवर शेगाव जवळील महामार्गावर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठमोठे खड्डे पडले होते जणू या रस्त्यावर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न अनेकांना निर्माण होत होता या मोठमोठ्या खड्ड्यामुळे अनेकांना वाहने चालवताना नाहक मोठा शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
या मोठमोठ्या खड्ड्यामुळे तसेच चीपचीप्या चीखलामुळे दुचाकीस्वारचा अपघात नक्कीच होत होता तर शेगाव मुख्य मार्गावर अशा प्रकारचे अनेक अपघात होत असल्याने येथील जनता तसेच परिसरातील जनता त्रासलेली होती याची दखल घेत येथील युवा तडफदार काँग्रेसचे कार्यकर्ते श्री राजूभाऊ चिकटे यांनी वेळेचं दखल घेत या गंभीर समस्या ची आपबीती चिमूर वरोरा या मार्गाचे काम करीत असलेली के सी सी कन्ट्रक्शन कंपनी यांच्या पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना माहिती दिली व रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अशी त्यांना विनवणी केली. परंतु केसीसी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी यांच्या विनवणीला मनावर घेतले नाही .
व रस्त्यावरील खड्डे तसेच राहिले व दररोज छोटे-मोठे अपघात होतच राहिले तेव्हा संताप व्यक्त करून स्थानिक शेगाव बु. येथील ठाणेदार श्री योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात सदर काम करीत असलेली कंट्रक्शन कंपनी च्या सर्व मुख्य अधिकाऱ्याला पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांची सभा घेतली व सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर एसीसी कंपनीच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले व दोन दिवसात या रस्त्यावरील असलेले खड्डे तात्काळ बुजवा अशी तम्मी दिली . तेव्हा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते श्री राजूभाऊ चिकटे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंत लोडे यांची विदारक आक्रोश ची भूमिका लक्षात घेत केसीसी कंट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात रस्त्यावरील असलेले खड्डे बुजवण्याची ग्वाही दिली.
व आज ती पूर्ण होत असून रस्त्यावरील असलेले खड्डे बुजविण्याची कार्य सुरू केले त्यामुळे नागरिकांमध्ये प्रवास्यामध्ये व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा दिलासा तर मिळाला परंतु अर्धवट असलेली काम कधी पूर्ण होणार असा देखील सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहे. तेव्हा यासोबत रस्त्यावरील असलेले खड्डे तात्काळ तर बुजवलेस यासोबत या रस्त्याचे अर्धवट असलेले काम तात्काळ पूर्ण करा अशी मागणी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते श्री राजूभाऊ चिकटे यांनी केली आहे.
काही दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर अन्यथा काँग्रेसचे सर्व युवा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक ची भूमिका घेऊन केसीसी कन्ट्रक्शन कंपनी विरोधात काय टोकाचा निर्णय घेईल हे आमचे कार्यकर्ते वेळेवरच ठरवेल तेव्हा भविष्यात उद्या कसल्याही प्रकारची नुकसान होणार नाही याची दखल सदर के सी सी कंपनी ने घ्यावी व तात्काळ उर्वरित व अर्धवट असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रवाशांना सुरळीत मार्ग निर्माण करून द्यावा. अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते राजूभाऊ चिकटे यांच्यासह यशवंतराव लोडे व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.






