🔸तालूकाध्यक्ष विवेक पाटील वानखेडे यांची प्रतीक्रीया
✒️विश्वनाथ महामुने महागाव Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.11 जून) :-
दि.10 जुन 2026 रोजी यवतमाळ येथे शेतकर्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. प्रामुख्याने 2025-26 च्या पिक विम्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्या संदर्भात तातडीने जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही सुरू करावी अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतांना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पूसण्याचे काम शासनाने केले आहेत,अशा प्रकारची शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला,अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.विखे पाटील कृषी परिषद उमरखेड कडून कृषी मंत्र्यांना सुध्दा या वेळी निवेदन देण्यात आले होते. लवकरात लवकर पिक विमा लागू करावा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा उमरखेड येथे पुन्हा विखे पाटील कृषी परिषद उपोषण करणार अशी मागणी परिषदेचे तालूकाध्यक्ष विवेक पाटील वानखेडे यांनी केली आहे.







