छ. संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत गुणवंताचा सत्कार

🔸मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.22 मे) :-

मराठा सेवा संघ महागांव तालुक्यांच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असते. यावर्षीही असाच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मातोश्री विद्यालय महागांव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला. 

या गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटक व मार्गदर्शक महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे,मार्गदर्शक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यशवंत देशमुख, प्रमुख पाहुणे काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष गावंडे होते. या गुणगौरव सोहळ्याची सुरुवात राजमाता,राष्ट्रमाता, जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली.

मान्यवरांचे स्वागत पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब लिखित मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला काय दिले? ही पुस्तिका देऊन करण्यात आले. या वेळी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महागांव तालुक्यांतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2026 दहावी व बारावी मध्ये तालुक्यांतून प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या व प्रत्येक शाळेतील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा घाटंजी येथे पात्र झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा अशा एकूण 125 गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरवपत्र,मराठा सेवा संघाची शिवधर्म दिनदर्शिका,पुष्पगुच्छ व पेन देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या कर्तुत्वानुसार आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे सांगितले. मराठा सेवा संघाचा हा स्तुत्य उपक्रम असून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यशवंत देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आत्मविश्वास बुलंद ठेवावा, येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावे तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा कर्तृत्ववान वारसा जपावा असे सांगितले. संस्कारामुळे आलेले श्रीमंती टिकून असते व संस्कारा शिवाय आलेली श्रीमंती ही विकाऊ असते असे सांगितले. या गुणगौरव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव डॉ. संदीप शिंदे, सहसचिव अमोल जगताप, तालुका अध्यक्ष उदयभाऊ नरवाडे,तालुका सचिव पंकज देशमुख,तालुका सदस्य चतुर्वेद अडकिने,स्वप्निल नरवाडे,तेजस नरवाडे, श्री कम्प्युटरचे संचालक मंगेश पाटील वानखेडे, शिक्षक अमोल शिंदे,रवी भांगे, विजय कदम,अंकुश शिंदे, किशोर सोळंके यांनी प्रयत्न केले.