✒️शेख रफिक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.22 मे) :-
माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील पोलिस पाटील सौ. रेखा प्रदीप जमदाडे यांच्या कन्या आदिती प्रदीप जमदाडे हिने दहावीच्या परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवत पुसद तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे माहूर व पुसद तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील गुंडवळ गावात शिक्षणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आदितीने हार न मानता आपल्या मामा गौतम मधुकर वाघमारे व मामी राजकन्या गौतम वाघमारे यांच्याकडे राहून शिक्षण पूर्ण केले. मामा-मामी यांच्या मार्गदर्शनासह स्वतःची जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.
आदितीच्या या यशाबद्दल जोतीदिर्गमय इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. तसेच कोटा कोचिंग क्लासचे सूरज सर, मनीषा मॅडम व इतर शिक्षकांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुणे येथे कार्यरत पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनीही भ्रमणध्वनीवरून आदितीचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदितीचे यश प्रेरणादायी ठरत असून अनेक पालकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. तिच्या यशामुळे जमदाडे कुटुंबियांचा अभिमान वाढला असून नातेवाईकांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.
पुढील शिक्षणासाठी आदितीवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी नातेवाईक अर्चना अशोक कांबळे, शालिनी अशोक कांबळे, रुपाली पानपत्ते, ज्योती अविनाश जमदाडे व ममता आकाश जमदाडे यांनीही अभिनंदन केले.







